Hinjewadi IT Park bus accident : पुण्यातील हिंजवडी IT पार्कमध्ये भीषण अपघात; भरधाव बस फूटपाथवर चढली अन् दोन भावंडाना चिरडलं!

Pune accident :आयटी कर्मचाऱ्यांना नेणाऱ्या या बसने दोन शाळकरी सख्ख्या बहीण-भावाला चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आणखी दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
Hinjewadi IT Park bus accident :  पुण्यातील हिंजवडी IT पार्कमध्ये भीषण अपघात; भरधाव बस फूटपाथवर चढली अन् दोन भावंडाना चिरडलं!

esakal

Updated on

Pune speeding bus accident : हिंजवडी आयटी परिसरातील रस्ते अपघाताचे सत्र थांबत नसल्याचे दिसून येत आहे. सोमवारी (ता. १) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हिंजवडी आयटी पार्कमधील छत्रपती शिवाजी चौकाजवळ भीषण अपघात घडला.

आयटी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी भरधाव बस थेट पदपथावर चढली. या बसने दोन शाळकरी दोघा सख्ख्या बहीण-भावाला चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाला. आणखी दोघेजण गंभीर जखमी आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

अर्चना देवा प्रसाद (वय ८), सुरज देवा प्रसाद (वय ६) अशी मृतांची नावे आहेत. तर प्रिया देवा प्रसाद (वय १६) व अविनाश हरिदास चव्हाण वय (वय २६) हे गंभीर जखमी असून विमल राजू ओझरकर (वय ४०) हे किरकोळ जखमी आहेत.

Hinjewadi IT Park bus accident :  पुण्यातील हिंजवडी IT पार्कमध्ये भीषण अपघात; भरधाव बस फूटपाथवर चढली अन् दोन भावंडाना चिरडलं!
Government Mandatory Preload APP : मोबाइल चोरी झाला, हरवला तरी 'No Tension'; सरकारी आदेशानुसार आता प्रत्येक स्मार्टफोनमध्ये असणार 'हे' खास 'APP'

या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी बसचालक नागनाथ राजाभाऊ गुजर (वय. ३६, रा. भोसरी) याला ताब्यात घेतले आहे. अर्चना, सूरज व प्रिया हे शाळेतून घरी परतत असताना ही घटना घडली. यातील गंभीर जखमींना जवळच्याच खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. तर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नवी सांगवीतील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहेत.

Hinjewadi IT Park bus accident :  पुण्यातील हिंजवडी IT पार्कमध्ये भीषण अपघात; भरधाव बस फूटपाथवर चढली अन् दोन भावंडाना चिरडलं!
Jaydatta Kshirsagar : मुख्यमंत्री फडणवीसांच्या 'Welcome'साठी जयदत्त क्षीरसागर हेलिपॅडवर हजर, पण सभेला मात्र गैरहजर!

आयटी परिसरातील रस्ते अपघातांचे सत्र थांबेना -

आयटी परिसरात डंपर खाली चिरडून दुचाकींस्वरांचा मृत्यू झाल्याच्या घटना पाठोपाठ घडत आहेत. अशातच सोमवारी देखील भीषण अपघात घडल्याने, नागरिकांची चिंता अधिकच वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com