
हैदराबादमधील आरामघर फ्लायओव्हरवरून एका अतिशय धोकादायक आणि बेजबाबदार कृत्याचा व्हिडिओ समोर आला आहे. एका तरुणाने आणि महिलेने स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालून इंस्टाग्रामवर रील बनवला. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये हे जोडपे बाईकवर धोकादायक स्टंट करताना दिसत आहे.