
Pandharpur Wari:शेकडो वर्षांपासून ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्या आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या भेटीसाठी जातात. महाराष्ट्रातून लाखो वारकरी मजल-दरमजल करीत वारीत पायी चालत असतात. राज्यातल्या हजारो पालख्या पंढरीच्या दिशेने दोन-दोन महिने चालतात. वारी हा आनंदाचा, सुखाचा आणि सर्वोच्च समाधानाचा सोहळा असतो.