Viral : धोनीने केलं लेकीसोबत नव्या वर्षाचं स्वागत; बायको साक्षीने शेअर केला Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

Viral : धोनीने केलं लेकीसोबत नव्या वर्षाचं स्वागत; बायको साक्षीने शेअर केला Video

आज नवीन वर्षाचा शेवटचा दिवस आहे. सर्वांनी उत्साहात नव्या वर्षाचे स्वागत केले आहे. तर अनेकांनी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री पार्टी करून मजा केली. अनेकजण आपल्या कुटुंबासोबत बाहेर फिरायला गेले आहेत. दरम्यान देशातील स्टार क्रिकेटपटून महेंद्रसिंग धोनी आपल्या कुटुंबासोबत फिरायला गेला आहे.

हेही वाचा - Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

धोनीची पत्नी साक्षी धोनी हिने आपल्या इंस्टाग्राम वरून धोनी आणि त्याची मुलगी झिवा हिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. नव्या वर्षाचं स्वागत होत असताना फुटणारे फटाके धोनी आणि झिवा असा हा व्हिडिओ आहे. अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. तर त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा: Viral Video : भर मंडपात नवरदेवाने पकडला मेहुणीचा हात; मग झाला...

दरम्यान, धोनीला सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. त्याच्या चाहत्यांनी त्याचे फोटो शेअर केले आहेत. त्याचबरोबर भारतीय क्रिकेट संघातील अनेक स्टार खेळाडू नवीन वर्षाच्या निमित्ताने सुट्टीचा आनंद घेत आहेत. त्यामध्ये विराट कोहली, हार्दिक पांड्या, धोनी आणि इतर खेळाडूंचा सामावेश आहे.