
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील नक्षलग्रस्त पूवर्ती गावात एक अनोखा आणि हृदयस्पर्शी प्रसंग घडला. नक्षल कमांडर हिडमाच्या गावात एका मुलीच्या लग्नात CRPF च्या 150 व्या बटालियनच्या जवानांनी भावाचं कर्तव्य निभावलं. जंगलात शहनाईचा मधुर नाद घुमला आणि गावकऱ्यांसह जवानांनी आनंद साजरा केला. हा प्रसंग केवळ लग्नाचा नव्हता, तर शांतता, विश्वास आणि परिवर्तनाचा प्रतीकात्मक क्षण होता. महाराष्ट्रातील अनेक नक्षलग्रस्त भागांशी साधर्म्य असलेल्या या घटनेतून शांती आणि विकासाच्या शक्यता दिसतात.