Video Viral : मांजरांची केस कटिंग; खुर्चीवर बसलेल्या क्यूट मांजराला पाहून म्हणाल... | cute cat hair cutting saloon viral video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

Video Viral : मांजरांची केस कटिंग; खुर्चीवर बसलेल्या क्यूट मांजराला पाहून म्हणाल...

काहीजण आपल्या पाळीव प्राण्याला खूप जीव लावतात. घरात पाळले जाणारे कुत्रे, मांजर यांना राहण्यासाठी विशेष व्यवस्था अनेकजणांकडून करण्यात येते. तर त्यांना माणसांसारखे कपडेही काहीजण घालतात. तर मांजरांच्या केस कापण्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ अनेक जणांनी शेअर केला आहे.

हेही वाचा - का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एकजण मांजराला खुर्चीवर बसवून त्याच्या केसाची कटिंग करत आहे. तर त्या क्यूट मांजराला पाहून आपणही म्हणाल 'किती गोड...' मांजरही लहान मुलांसारखं व्यवस्थित बसलेलं पाहून अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. तर तब्बल २० लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

हेही वाचा: Viral Video : पठ्ठ्याने केला नाद! शाम्पू लावून घातली नागाला अंघोळ

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे.

यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.