Viral Video : पठ्ठ्याने केला नाद! शाम्पू लावून घातली नागाला अंघोळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

Viral Video : पठ्ठ्याने केला नाद! शाम्पू लावून घातली नागाला अंघोळ

साप हा शब्द ऐकला तरी आपल्या अंगावर काटा येतो. समोरासमोर साप बघितला तर विषयंच नाही. एकजण तर शाम्पू लावून सापाला अंघोळ घालत आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांनी शेअर केलं असून मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

(king kobra shampoo bath viral video)

हेही वाचा - का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कोब्रा जातीच्या सापाला शाम्पू लावून अंघोळ घालताना दिसत आहे. तर या व्हिडिओमध्ये सापही या अंघोळीचा आनंद घेताना दिसतोय. हा व्हिडिओ पाहून आपणही हैराण व्हाल. तर प्रथमदर्शनी हा साप त्याने पाळलेला असल्याचं समोर आलं आहे. तर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे.

यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.

टॅग्स :snakeBathviral video