Viral Video : स्कुटीवर पित होते फ्रुटी; चक्रीवादळ आलं अन् सगळ्यांनाच घेऊन गेलं

चक्रीवादळात उडालेली स्कूटी 15 फूट उंच तारेवर जाऊन अडकली
Video
VideoSakal

सोसाट्याचा वारा आल्यावर अनेक नागरिकांचे हाल होत असतात. तर चक्रीवादळात किंवा वावटळीत अनेक कामाच्या वस्तू उडून गेल्याच्या घटना आपण ऐकल्या असतील. पण सध्या एक अजब व्हिडिओ समोर आला असून एका वादळात चक्क दुचाकी उडून गेली आहे. ती चक्क १५ फूट उंचीवरील लाईटच्या तारेवर जाऊन अडकली आहे.

Video
Video : याला म्हणतात खरी मैत्री! निराधार चिमुकल्यासोबत खेळतोय श्रीमंत घरातील कुत्रा

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. "स्कुटीवर पित होते फ्रुटी, चक्रीवादळ आलं अन् सगळ्यांनाच घेऊन गेलं" अशा विनोदी कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. ही घटना जम्मू येथे घडली असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. ही दुचाकी चक्क १५ फूट उंचीवरील तारेवर जाऊन अडकली आहे. हे दृश्य पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

दरम्यान, ही घटना पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोकं हजर झाले असून या ठिकाणी काही पोलिसही हजर असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. ट्वीटरवरील Jammu Links News या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून सोशल मीडियावर हा चर्चेचा विषय ठरला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com