
उत्तर प्रदेशातील कानपूरमधील बिल्हौर परिसरातील एका ढाब्यावर घडलेल्या धक्कादायक घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही घटना भवानीपूर जीटी रोडवरील बाजपेयी रमैया ढाबाची आहे. जिथे एका ग्राहकाला तंदुरी रोटीमध्ये मृत पाल आढळली. ही घटना ८ ऑगस्ट रोजी घडली होती. त्यानंतर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून लोक संतापले आहेत.