
Deccan Queen ATM: मुंबई-पुणे रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना जर प्रवासादरम्यान रोख रक्कमेची चणचण भासली तर त्यांना काळजी करण्याची गरज नाही. कारण रेल्वेनं त्यांना धावत्या रेल्वेमध्येच एटीएमची सुविधा उपलब्ध करुन दिली. प्रवाशांच्या सोयीसाठी गाड्यांमध्ये अनेक सुविधा रेल्वेनं सुरु केल्या आहेत. त्यात आता या आणखी एका नव्या सुविधेची भर पडली आहे. डेक्कन क्वीनमध्ये ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मुंबई-नाशिक पंचवटी एक्स्प्रेसनंतर आता रेल्वे प्रशासनानं डेक्कन क्वीनमध्ये ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.