
Summary
१८ वर्षांच्या मुलीने मासिक पाळी थांबवण्यासाठी हार्मोनल गोळ्या घेतल्या आणि तिला डीप व्हेन थ्रोम्बोसिस झाला.
डॉक्टरांनी तिला रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला, पण तिच्या वडिलांनी तो नाकारला.
रात्री अचानक श्वास घेण्यात अडचण निर्माण झाल्याने मुलीचा मृत्यू झाला.
एका १८ वर्षांच्या मुलीने मासिक पाळी थांबवण्यासाठी काही हार्मोनल गोळ्या घेतल्या, यामुळे तिचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. गोळ्या घेताच तिला डीप व्हेन थ्रोम्बोसिस झाला. डॉक्टरांनी तिला अॅडमिट करण्यास सांगितले पण तिच्या वडिलांनी नकार दिला. पण दुर्दैवाने मध्यरात्री मुलीचा मृत्यू झाला. रक्तवहिन्यासंबंधी सर्जन डॉ. विवेकानंद यांनी त्यांच्या रीबूटिंग द ब्रेन पॉडकास्टमध्ये या घटनेबद्दल सांगितले.