Viral Video : लाजिरवाणं! गिटार वाजवणाऱ्या कलाकाराला पोलिसाने दिलं हाकलून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

VIdeo

Viral Video : लाजिरवाणं! गिटार वाजवणाऱ्या कलाकाराला पोलिसाने दिलं हाकलून

गिटार वाजवणाऱ्या एका कलाकाराला पोलिसाने हाकलून दिल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना दिल्लीत घडली असून दिल्लीतील कॉननॉट प्लेस येथे हा व्यक्ती आपली कला सादर करत होता. त्यानंतर पोलिसांनी याचे गाणे थांबवत त्याला उठायला सांगितले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक कलाकार गिटार वाजवत आपली कला सादर करत आहे. तर अनेकजण त्याच्या कलेला साद देत टाळ्या वाजवताना या व्हिडिओत दिसत आहेत. तर त्यानंतर एका पोलिसाने त्याच्या सगळ्या वस्तू गोळा करायला लावत त्याचे गाणे बंद पाडले आहे.

तर या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. कला सादर करणे चुकीचे आहे का? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. तर या ठिकाणी लोकांना जमा होण्याची मनाई असल्याचं अनेकांनी कमेंट करून सांगितलं आहे.

टॅग्स :artistviral video