

Dipanshu Jindal secured All India Rank 38 in the UPSC Civil Services Examination in his third attempt. After losing both parents, he continued his preparation with the support and encouragement of his sister
esakal
आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती निर्माण झाली, तरी जिद्द, मेहनत आणि जवळच्या व्यक्तींचा पाठिंबा असेल तर यशाचा मार्ग गाठता येतो, हे दीपांशु जिंदाल याच्या प्रवासातून दिसून येते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेत दीपांशुने तिसऱ्या प्रयत्नात अखिल भारतीय स्तरावर ३८ वा क्रमांक मिळवला. लहान वयात आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, अशा परिस्थितीतही त्याने प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न सोडले नाही. या प्रवासात त्याच्या बहिणीने दिलेली साथ आणि दाखवलेला विश्वास त्याच्यासाठी मोठा आधार ठरला.