Viral Video : बिडीने लावली आग! काकाचे रॉकेट लाँचिंग बघून नासालाही आली जाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : बिडीने लावली आग! काकाचे रॉकेट लाँचिंग बघून नासालाही आली जाग

सध्या सगळीकडे दिवाळीचा उत्साह चालू आहे. सगळेजण फटाके फोडण्यात आणि दिवाळीचा फराळ फस्त करण्यात मग्न असतील. पण तरूण मुले फटाके फोडण्याचे नवनवे प्रयोग करताना आपल्याला आजकाल दिसतात. तर अनेकजणांना यामुळे दुखापती झाल्याचे प्रकारही समोर आले आहेत. अशाच एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(Rocket Launching Viral VIdeo)

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बिडी ओढत आहे. तर त्या बिडीने वात पेटवून रॉकेट सोडत आहे. त्यांच्या रॉकेट सोडण्याची स्पीड पाहून आपणही थक्क व्हाल. तर हा व्हिडिओ अनेकजण शेअर करत असून या व्हिडिओ पाहून नासालाही जाग आली अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

दरम्यान, दिवाळीचे फटाके फोडताना सर्वांनी काळजी घेतली पाहिजे पण या काकाचा सफाईदारपणा पाहून सगळेजण आश्चर्यचकित झाले आहेत. तर एका हातात रॉकेट आणि दुसऱ्या हाताने लाँचिंग पाहून सगळेजण या व्हिडिओला शेअर करत आहेत. या व्हिडिओला अनेकांनी लाईक आणि शेअर केले आहे.