
Anant Ambani: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरपर्सन आणि भारतातील बडे उद्योगपती मुकेश अंबानी यांनी सहकुटुंब प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर आज पवित्रस्नान केलं. यावेळी अनंत अंबानी यांनी आपल्या भावंडांसह पाण्यात डुबकी मारतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अशा पद्धतीनं कोणी पवित्र स्नान करत का? असा सवाल नेटकरी करत आहेत. तर अनेकांनी त्यांच्या व्हीआयपी ट्रिटमेंटवरही बोट ठेवलं आहे.