Video : प्रेम असावं तर असं! बॅगेत घालून, मांडीवर बसवत लोकलमधून कुत्र्याचा प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dog

Video : प्रेम असावं तर असं! बॅगेत घालून, मांडीवर बसवत लोकलमधून कुत्र्याचा प्रवास

आपल्या घरात कुत्रा किंवा मांजर असे पाळीव प्राणी असतील. अनेकांनी पाळीव प्राणी आवडत नसतात पण अनेकजण आपल्या घरी हमखास कुत्रा किंवा मांजरांच पालन करत असतात. तर अनेकजण प्राण्यांना घरातील कामे शिकवतात. पण पाळीव प्राण्यावर प्रेम असावं तर असं... हा व्हिडिओ पाहून तुम्हीही जरा भावनिक व्हाल.

हेही वाचा - शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

सध्या एका लोकलमधील तरूणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो आपल्या बॅगमध्ये एका कुत्र्याला घेऊन चालल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर मध्येमध्ये तो कुत्र्याला बॅगेतून काढून मांडीवर बसवत आहे. हा कुत्रा एवढा गोड आहे की त्या पिल्ल्याला पाहून आपलंही मन भरून येईल.

दरम्यान, हा व्हिडिओ इंस्टाग्रावर शेअर करण्यात आला असून त्याला ३४ लाखांपेक्षा जास्त व्यूव्ज मिळाले आहेत. तर तेवढ्याच लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे. हा व्हिडिओ अनेकांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केला असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :DogLoverviral video