Dog Funny Viral Video : महिला निघाली कुत्र्याला फिरवायला, पण कुत्र्यानंच तिला फिरवलं, पाहा व्हिडीओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dog Funny Viral Video

Dog Funny Viral Video : महिला निघाली कुत्र्याला फिरवायला, पण कुत्र्यानंच तिला फिरवलं, पाहा व्हिडीओ

Dog Funny Viral Video : सोशल मीडियावर सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो बघून तुम्हाला तुमचं हसू कंट्रोल होणार नाही. सध्या घरात कुत्रा मांजरी यांसारखे पाळीवप्राणी पाळण्याचं प्रमाण बरंच वाढलं आहे. शहरांमध्ये बहुतांश फ्लॅट सिस्टीम असल्याने प्राण्यांना बाहेर फिरवायला न्यावं लागतं.

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात मुलगी कुत्र्याला पार्कमध्ये फिरवायला घेऊन गेली आणि पुढच्या काही वेळातच मुलगी तलावात बसलेली दिसली. हे बघून लोकांचं हसू आवरत नाही. नेमकं असं काय घडलं बघूया.

हे ही वाचा - राष्ट्र तरेल कसे? धर्मकारणातून की धर्मनिरपेक्षतेतून?

या ११ सेकंदाच्या व्हायरल क्लिपमध्ये दिसतं आहे की, महिला आपल्या पाळीव कुत्र्याला फिरायला गेऊन गेली. तिच्या हातात कुत्र्याचा पट्टा असतो. त्याने ती कुत्र्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण तलावाच्या काठाने जाताना कुत्र्याला तलावात काही पक्षी बसलेले दिसतात.

हेही वाचा: Viral Video: मुबईत RPF जवानांनी वाचवला माय-लेकराचा जीव, सर्वत्र होतय कौतुक

ते पकडण्यासाठी कुत्रा धावत सुटतो. त्याला आवारण्याचा पूर्ण प्रयत्न करूनही त्या मुलीकडून आवरला जात नाही आणि ती त्याच्या ताकदीने ओढली जाते. ज्यामुळे ती थेट तलावातच जाऊन बसते.

हेही वाचा: Viral Video: वाजतगाजत निघाली गायीची अंत्ययात्रा; कुटुंबीय म्हणाले, आमची आई गेली

ट्वीटर हँडल @puppiesDoglover वरून हा व्हिडीओ टाकण्यात आला आहे. काही वेळातच या क्लिपवर ४ लाख १८ हजार पेक्षा जास्त व्हिव्यूज होते. १४ हजारहून जास्त लाइक्स आणि दीड हजार रिट्वीट मिळाले आहेत. युझर्स यावर भरभरून प्रतिक्रीयापण देत आहेत.

टॅग्स :Dogviral video