Video Viral : याला म्हणतात नेतृत्व! कुत्रा दाखवतोय चक्क गायींना वाट | Dog Making Way For A Herd Of Cattle Viral Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

Video Viral : याला म्हणतात नेतृत्व! कुत्रा दाखवतोय चक्क गायींना वाट

नेतृत्व करणं सर्वांनाच जमत नाही. त्याचे गुण मुळातंच अंगात असावे लागतात. तर अनेकजण नेतृत्व करण्यात फेल ठरतात. असे अनेक उदाहरणे पाहिले असतील पण चक्क बर्फाच्या प्रदेशात चक्क कुत्रा गायींना वाट दाखवत त्यांच्या कळपाला नेतृत्व करताना आपण पहिल्यांदा पाहत असाल. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

(Dog Making Way For A Herd Of Cattle Viral Video)

हेही वाचा - महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक बर्फाच्या प्रदेशात जनावरांचा कळप चालला आहे. कळपातील गायींच्या पुढे एक कुत्रा चालला असून तो बर्फावरून वाट करून देत आहे. त्याच्या पाठीमागे सर्व जनावरे चालताना आपल्याला दिसत आहे. तर "नेतृत्व त्याला म्हणतात जो दुसऱ्यांसाठी वाट बनवतो मग तो लहान असो किंवा मोठा काही फरक पडत नाही" असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा: Bharat Jodo Yatra : अडवाणींना अटक करत भाजपची रथयात्राही रोखण्यात आली होती

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे.

यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.

टॅग्स :DogCattleviral video