Bharat Jodo Yatra : अडवाणींना अटक करत भाजपची रथयात्राही रोखण्यात आली होती

Rahul Gandhi
Rahul GandhiSakal

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी टार्गेट केलं जातंय. सावरकर हे दोन तीन वर्षे अंदमानच्या तुरूंगात राहिले आणि त्यानंतर त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवायला सुरूवात केली असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. भाजपकडून या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेण्यात आलाय. पुण्यात त्यांच्या वक्तव्याचे चांगलेच पडसाद उमटले असून राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आलंय. तर सुरू असलेली भारत जोडो यात्राही रोखण्याचा प्रयत्न भाजप आणि मनसेच्या काही नेत्यांकडून करण्यात येतोय पण भाजप पक्षाच्या कारकिर्दीतही १९९० मध्ये जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची यात्रा बिहारचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी रोखून त्यांना अटक केली होती.

(Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra And Lal krushna Advani's Rath Yatra)

हेही वाचा - का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

साल १९८४. भाजपला लोकसभा निवडणुकांत चांगलाच फटका बसला होता. त्यानंतर पुढच्या निवडणुकांत भाजपला करिश्मा दाखवावा लागणार होता. दोन वर्षानंतर राममंदिराचा मुद्दा देशभरात जोर धरू लागला होता. त्यामुळे देशभरातल्या कारसेवकांना अन् स्वयंसेवकांना एकत्र आणण्यासाठी लालकृष्ण अडवाणी यांनी १९९० मध्ये गुजरातमधील सोमनाथपासून उत्तरप्रदेशातील आयोध्येपर्यंत 'रथयात्रा' सुरू केली होती. या यात्रेची संकल्पना होती ती मराठी नेते प्रमोद महाजन यांची. त्यामध्ये पक्षाचाही वैयक्तिक फायदा होता म्हणाच... पण या यात्रेचा मुख्य उद्देश कारसेवक आणि संघाच्या स्वयंसेवकांना एकत्र करणे हाच होता.

Rahul Gandhi
"अरे मूर्खा कुठे भटकतोस?" पोंक्षेंचे अंदमानमधून राहुल गांधींना चॅलेंज, Video Viral

एसी गाडीला फुलांनी सजवलं गेलं. त्या गाडीला रथाचं स्वरूप दिलं गेलं. तब्बल साडेसतराशे किलोमीटरचा प्रवास करायचा होता. सगळी तयारी झाली अन् निघाली रथयात्रा. या यात्रेच्या पहिल्या टप्प्यातील सगळं नियोजन सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं होतं. कारण मोदी यांनी अगोदरच 'ही यात्रा रोखून दाखवा' असं चॅलेंज केलं होतं. त्याचबरोबर त्यांच्याकडे नेतृत्व कौशल्य असल्यामुळे ते या यात्रेची व्यवस्था पाहत होते. यात्रेत भाजपचे जेष्ठ नेतेही उपस्थित होते. हिंदुत्वाचा प्रचार करत, मुखी राम नाम घेत अन् राम मंदिराच्या निर्माणाचा विचार घेत यात्रा निघाली...

हिंदुत्वाच्या छताखाली लोकांना जोडण्याचं काम सुरू होतं. पण काही जणांकडून या यात्रेला विरोध होत होता. बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनीही मोदी यांनी दिलेलं चॅलेंज स्विकारलं आणि ही यात्रा रोखण्यासाठी दंड थोपटले. अडवाणी यांना अटक करण्याची योजना त्यांनी आखली आणि अखेर आयोध्येला पोहचण्याअगोदरच अडवाणींना अटक करण्यात आली.

Rahul Gandhi
Ranjeet Savarkar: नेहरुंना हनीट्रॅपमध्ये अडकवून देशाची फाळणी केली - रणजित सावरकर

हिंदुत्वाच्या नावाखाली ही यात्रा सांप्रदायिक हिंसाचाराकडे नेत असल्याचा आरोप बिहारचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादवांनी केला. पण तोपर्यंत अडवणींच्या या यात्रेने आख्खा उत्तरप्रदेश व्यापून टाकला होता. लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा आयोध्येला पोहोचण्याआधी त्यांना बिहारमध्ये अटक झाल्यामुळे वाद पेटला. कारसेवक आक्रमक झाले. त्यांच्याविरोधात लालू प्रसाद यादवांविरोधात असंतोष निर्माण झाला. अटकनेनंतर यात्रा तिथेच संपली पण ही वादाची ठिणगी पुढे बाबरी मशीद पाडण्याला कारणीभूत ठरली.

पुढे १९९२ मध्ये बाबरी पाडली गेली. या सर्वांचा फायदा पुढे भाजपला झाला आणि १९९६ च्या लोकसभा निवडणुका भाजप आणि युती सरकारने जिंकल्या होत्या. राम मंदिराच्या नावाखाली काढलेल्या यात्रेनंतर भाजपला मोठा फायदा झाला. १९८४ च्या लोकसभा निवडणुकांत फक्त दोन जागांवर निवडून आल्यानंतर भाजपने राम मंदिराच्या मुद्द्यावर १९८९ च्या निवडणुकांत ८५ जागांपर्यंत मजल मारली. पुढे रथयात्रेनंतर बाबरी मशिदीच्या प्रकरणही देशभर गाजलं अन् १९९६ मध्ये भाजपला १६१ जागा जिंकता आल्या. त्यानंतर भाजचा निवडणुकांतील आलेख चढताच राहिला. पण प्रमोद महाजनांच्या संकल्पनेतील रथयात्रेने भाजपला मोठा फायदा झाला हे नक्की...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com