

Dog viral video
Sakal
Viral Video: खरी भक्ती ही केवळ माणसांमध्येच नाही तर प्राण्यांमध्येही दिसून येते. याचे जिवंत उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात घडलेली घटना आहे. एका मंदिरात चक्क एका कुत्र्याने तासंतास हनुमानाच्या मूर्तीभोवती प्रदक्षिणा घातल्या आहे. हे पाहून भाविकच नव्हे तर सामान्य नागरिक देखील आश्चर्यचकित होत आहे.