
Viral News: अपघात कुठेही आणि कसाही होऊ शकतो. अमेरिकेत एका व्यक्तीसोबत असेच काही घडले आहे. पाळीव कुत्र्याने आपल्या मालकावरच गोळी झाडली. मालक त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बेडवर होता. दरम्यान कुत्र्याने बेडवर उडी मारली अन् त्याचा पाय बेडवरील पिस्तुलावर पडला, ज्यातून गोळी झाडली गेली. ही गोळी मालकाच्या मांडीला लागली. यातो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर आत रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अमेरिकेतील टेनेसी मध्ये ही घटना घडली.