WhatsAppवर चॅटींग करताना फॅन्सी अन् आकर्षक फॉन्ट वापरायचेत? ही आयडिया वापरुन पाहा

व्हॉट्सअॅपमध्ये दिवसेंदिवस युजर्सला आकर्षित करणारे नवनवे बदल केले जात आहेत.
WhatsApp
WhatsApp

WhatsApp Fonts : जर तुम्हाला व्हॉट्सअॅपवर चॅटींग करताना सध्याचा फॉन्ट आवडत नसेल, उलट फॅन्सी आणि आकर्षक फॉन्ट वापरण्यास तुम्ही उत्सुक असाल तर तुम्हाला नवा पर्याय उपलब्ध आहे. काय आहे हा पर्याय जो तुमचं चॅटींग अधिक मजेशीर बनवेल. (Dont like WhatsApp message font how to change it to your favourite colour)

WhatsApp
Amit Shah: मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, यंदा 300 पार जाऊ; अमित शहांनी व्यक्त केला विश्वास

अशा पद्धतीचे फॉन्ट्स वापरण्यासाठी तुम्हाल थर्ड पार्टी अॅप वापरावं लागेल. पण हे अॅप तुम्ही काळजीपूर्वक वापरायला हवं. कारण हे अॅप डाऊनलोड होताना कुठल्याही प्रकारची परवानगी मागत नाही. कारण सर्वसाधरणपणे अशा प्रकारे अॅप डाऊनलोड होत नाहीत. कारण व्हॉट्सअॅपमध्ये तुमचा महत्वाचा डेटा जसं मेसेज, फोटो, व्हिडिओ किंवा व्हॉईस मेसेजही असू शकतात. त्यामुळं या फीचरचा वापर करताना काळजी घेतली पाहिजे. (Latest WhatsApp News)

WhatsApp
Sharad Pawar: "राष्ट्रवादीचं केजरीवालांना पूर्ण समर्थन", पवारांची घोषणा, केंद्रावर साधला निशाणा

WhatsAppमध्ये फॅन्सी फॉन्ट वापरण्यासाठी काय कराल?

१) सर्वात प्रथम तुम्हाला प्ले स्टोअरला जावं लागेल. तिथून तुम्ही Stylish Text - Font Keyboard डाऊनलोड करा.

२) त्यानंतर अॅप ओपन करा आणि उजव्या बाजुला खालच्या दिशेला असलेल्या अॅरोवर सातत्यानं त्यावर क्लिक करत राहा.

३) त्यानंतर अॅग्री बटनवर क्लीक करा त्यानंतर किबोर्डच्या सेक्शनला जा आणि उजव्या खालच्या कोपऱ्यातलं बटनवर क्लीक करा.

४) त्यानंतर Stylish Text Keyboard ऑप्शनवर जाऊन इनेबल किबोर्डवर क्लीक करा

५) त्यानंतर पुन्हा एकदा अॅक्टिव्हेट या बटनवर क्लीक करा

६) त्यानंतर तुमच्या व्हॉट्सअॅपवर जा आणि कुठलंही चॅट ओपन करा. त्यानंतर तुम्ही नेमही जसं टायपिंग करता असंच टायपिंग किबोर्डवर जाऊन करा.

७) या किबोर्डवर तुम्हाला स्टायलिश फॉन्टचा ऑप्शन दिसून येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com