
Viral Video : 'दादू दूध दे ना लवकर...'; हत्तीच्या पिल्ल्याची गोड आरोळी ऐकलीये का?
आपण प्राणी संग्रहालयात हत्ती पाहिले असतील. पण त्यांच्या पिल्लांना पाहण्याचा योग सर्वांना आला नसेल. एका क्यूट हत्तीच्या पिल्ल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो आपल्या केअर टेकरकडे दुधासाठी मोठ्याने आरोळी ठोकताना दिसत आहे. तर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा - सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...
हा व्हिडिओमध्ये एका प्राणी संग्रहालयातील असून तेथे पर्यटक प्राणी पाहण्यासाठी आले आहेत. तर केअर टेकर हत्तीच्या पिल्लाला दूध पाजतानाचा हा व्हिडिओ आहे. तो दुधामध्ये काहीतरी औषध घालून त्याला प्यायला देतो. तेव्हा हत्तीचे पिल्लू खाली वाकून सोंड वाकडी करून आरोळी ठोकत आहे.
दरम्यान, हत्तीच्या पिल्लाचा हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. तर त्याची ती क्यूट आरोळी पाहून तुम्हालाही हत्तीच्या पिल्लाला प्रत्यक्षात पाहण्याचा मोह आवरणार नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी यावर आपल्या मजेशीर कमेंट केल्या आहेत.