
Video: अर्रर्रर्र...हत्ती घरात घुसला पण बाहेर निघताना झाले वांदे
कोलकत्ता : सध्या एका हत्तीचा व्हिडिओ व्हायरल होत असून तो घरात अडकल्याचं आपल्याला दिसत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पश्चिम बंगालमधील असून तो या घरात अन्नाच्या शोधात गेल्याचं सांगितलं जातंय. पण हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. हा हत्ती घरात घुसलाच कसा? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
(Elephant in Home Viral Video)
सदर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक हत्ती एका रूग्णालयाच्या गेटमध्ये अडकला असून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण दरवाजा त्याच्या शरिराच्या आकाराच्या तुलनेत लहान असल्याने त्याला बाहेर येण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागत आहे. अखेर तो पुढचे दोन पाय गुडघ्यात दुमडून बाहेर येतो. यानंतर हा व्हिडिओ अनेक लोकांनी शेअर केला आहे.
हा व्हिडिओ साकेत या ट्वीटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याचबरोबर वन अधिकारी सुशांत नंदा यांनीही हा व्हिडिओ शेअर केला आहे. ते म्हणाले की, हत्तीला कोणत्याही सस्तन प्राण्यांपेक्षा जास्त प्रमाणात वास येतो. कुत्र्यांप्रमाणेच त्यांनाही दूरवर असलेल्या पदार्थांचा वास येतो असं त्यांनी सांगितलं.