Video Viral : मानवाच्या अतिक्रमणामुळे हत्तीवर प्लास्टिक खाण्याची वेळ | Elephant Eat Plastic Bag Viral Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

Video Viral : मानवाच्या अतिक्रमणामुळे हत्तीवर प्लास्टिक खाण्याची वेळ

मानवाने नैसर्गिक संसाधनांवर अतिक्रमण केलं आणि निसर्गाने त्याचं फळ हळूहळू द्यायला सुरूवात केली. नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, महापूर हे त्याचेच उदाहरणे. पण मानवाने केलेल्या अतिक्रमणामुळे जंगली प्राण्यांना धोका पोहोचलाय. जंगलात फिरायला जाणाऱ्या पर्यटकांनी फेकलेल्या पिशव्या जंगली प्राण्यांना खाण्याची वेळ सध्या आली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.

(Elephant Eat Plastic Bag Viral Video)

हेही वाचा - का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

दरम्यान, सुप्रिया साहू या महिला IAS अधिकाऱ्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक हत्ती प्लास्टिकची पिशवी खात असताना दिसत आहे. 'मानवाने जंगलात टाकलेल्या प्लास्टिक पिशव्यांची किंमत जंगली प्राण्यांना मोजावी लागते. त्यांना याचा काय त्रास होत असेल?' असं सुप्रिया यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. तर हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा: Viral Video: शेवटी आईच ती! पिल्लांसाठी कोंबडी भिडली नागाला अन्...

दरम्यान, जंगलात किंवा नैसर्गिक साधनसंपत्ती असलेल्या ठिकाणी फिरायला गेल्यावर सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. प्राण्यांना आणि तेथील जीवसृष्टीला धोका पोहचेल असे कोणतेही कृत्य करू नये. आपल्या एका बेजबाबदारपणामुळे मोठा धोका पोहची शकतो याचं भान आपण ठेवलं पाहिजे.