Viral Video: शेवटी आईच ती! पिल्लांसाठी कोंबडी भिडली नागाला अन्... | hen fight with cobra snake for chicken viral video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

Viral Video: शेवटी आईच ती! पिल्लांसाठी कोंबडी भिडली नागाला अन्...

आई ही आईच असते. ती आपल्या लेकरासाठी किंवा पिल्लांसाठी जीव द्यायला तयार असते. तिला आपल्या जिवापेक्षा लेकरू जास्त महत्त्वाचं असतं. असाच एका कोंबडीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये एक कोंबडी आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी नागासोबत लढताना दिसत आहे.

(hen fight with cobra snake for chicken viral video)

हेही वाचा - का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक कोंबडी सापासोबत लढताना दिसतेय. तर तिचे भयभीत झालेले पिल्ले एका कोपऱ्यात बसले आहेत. शेवटपर्यंत कोंबडी नागाला पळवून लावण्याचा प्रयत्न करत आहे. पिल्लांना वाचवण्यासाठी नागाला भिडणाऱ्या आईचा हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे. पण शेवटी आई ही आईच असते.

हेही वाचा: Video Viral : मांजरांची केस कटिंग; खुर्चीवर बसलेल्या क्यूट मांजराला पाहून म्हणाल...

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे.

यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.

टॅग्स :Chickenhenviral video