Viral Video
Viral VideoSakal

Viral Video : शेवटी आईच ती! लेकराला वाचवण्यासाठी मगरीला भिडली | Mother

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Published on

आई ही शेवटी आईच असते. ती आपल्या लेकरांना डोळ्यात तेल घालून जपत असते. तर आपल्या लेकरांवर कोणतेही संकट आले तर ती त्या संकटाशी दोन हात करते. प्रत्येक आईला आपल्या लेकरांचं कौतुक असतं. सध्या अशाच एका आईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Viral Video
Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक हत्तीण आपल्या लहान पिल्लाला वाचवण्यासाठी मगरीशी दोन हात करताना दिसत आहे. हत्तीण आणि तिचे पिल्लू पाणवठ्याकडे गेल्यानंतर पाण्याच्या डबक्यात मगरीची हालचाल हत्तीणीला दिसते. मगरीने आपल्या पिल्लावर हल्ला करू नये यासाठी हत्तीणीने तिला पळवून लावले.

आई ही शेवटी आईच असते. आपल्या लेकरांच्या संरक्षणासाठी ती काहीही करू शकते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला असून यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. फेसबुकवर धनंजया नरनबड्डा या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com