Viral Video : सोंडेत ब्रश घेऊन हत्तीने काढलं GF चं चित्र; भलेभले पेंटरही पडले कोड्यात

Viral Video
Viral VideoSakal

प्राणीसंग्रहालयात गेल्यावर हत्ती पाहणे हे सर्वांचे आकर्षण असते. प्राणीसंग्रहालय सोडलं तर आपण जंगल सफारीला गेल्यावर हत्ती पाहतो पण चित्र काढणारा हत्ती पाहून आपल्याला आपल्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. सध्या चित्र काढणाऱ्या हत्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Viral Video
..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

व्हायरल होत असलेला व्हिडिओ प्राणीसंग्रहालयातील असल्याचं दिसतंय. तर मोठ्या कॅनव्हासवर हा हत्ती सोंडेत ब्रश घेऊन चित्र काढत आहे. त्याने छानसं निसर्ग चित्र काढलं असून त्या चित्रावर हत्तीसुद्धा आहे. हे पाहून आपल्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. या चित्रातील दुसरा हत्ती पाहून "या हत्तीने तर आपल्या गर्लफ्रेंडचं चित्र काढलं" अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर हा व्हिडिओ आत्तापर्यंत २ लाख ६० हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com