

A heartbreaking moment shows a terminally ill father sharing his final advice with his son
esakal
वडिलांनंतर मुलगा हाच कुटुंबाचा मुख्य आधारस्तंभ असतो असे म्हटले जाते. समाजाने नेहमीच पुरुषांवर कुटुंबाच्या संरक्षणाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळेच, जेव्हा एखादे वडील आपल्या आयुष्याच्या अंतिम टप्प्यावर असतात, तेव्हा ते आपल्या मुलाला मग तो तरुण असो वा लहान असो त्याला मार्गदर्शन आणि सूचना देतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक भावनिक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याने पाहणाऱ्यांचे डोळे पाणावले आहेत या व्हिडिओमध्ये मृत्यूच्या दारात असलेले वडील आपल्या सात वर्षांच्या मुलाला जे शब्द सांगतात, ते पाहून नक्कीच तुमच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही.