

An image showing the luxurious bathroom setup that reportedly includes a toilet seat worth ₹88 crore — sparking massive debate online.
esakal
expensive toilet seat : मागील काही दिवसांपासून एक टॉयटेल सीट चांगलाच चर्चेचा विषय बनत आहे. यामागे कारणही तेवढंच खास आहे. कारण, या टॉयलेट सीटची किंमत तब्बल ८८ कोटी रुपये आहे. होय!! तुम्ही बरोबरच वाचत आहात. हे साधंसुधं टॉयलेट सीट नाही तर प्रसिद्ध इटालीयन कलाकार मॉरिजियो कॅटेलन यांनी १८ कॅरेट शुद्ध सोन्यापासून ते तयार केलेलं आहे.
विशेष म्हणजे या टॉयलेट सीटला १८ नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्कच्या सोथेबीज लिलावात सादर केले जाणार आहे. सांगितले जात आहे की, या टॉयलेट सीटला विशेष कलाकुसरीने बनवलं गेलं आहे आणि याचे वजन २२३ पाउंड आहे. याची सुरुवातीची बोली जवळपास १० मिलिनय डॉलर म्हणजे ८८ कोटी ठेवण्यात आली आहे. सोथेबीज यांच्या मते ही बोली आणखी वाढू शकते.
सोनेरी सिंहासनासारखी वाटणारी टॉयलेट सीट ८ नोव्हेंबरपासून सोथेबीजच्या नवीन मुख्यालय, ब्रुअर बिल्डिंगमधील बाथरूममध्ये प्रदर्शित केली जाईल. पर्यटकांना ती पाहण्याची संधी मिळेल. यापूर्वी, हेच टॉयलेट सीट गुगेनहाइम संग्रहालयात (२०१६) प्रदर्शित करण्यात आले होते. यावर कुणीही बसणार नाही असे आयोजकांनी सांगितले आहे. तर सोथेबीचे तज्ज्ञ डेव्हिड गॅल्पेरिन म्हणाले, की कलाकृतीवर लोकांनी बसावं असं आम्हाला वाटत नाही.
कॅटेलन यांनी ही कलाकृती एक विरोधाभासी सामाजिक भाष्य म्हणून तयार केली होती आणि तिला "अमरिका" असे नाव दिले होते. त्यांनी सांगितले की त्यांना कोणत्यातरी मौल्यवान वस्तूला "सर्वात कमी महान आणि सर्वात आवश्यक ठिकाणी ठेवायचे होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.