
South Asia Health Crisis: दररोज तुम्ही व्यायाम करु शकता, चांगलं खाऊ शकता आणि पुरेशी झोपही घेऊ शकता. पण एक अशी गोष्ट आहे ज्यापासून तुम्ही वाचू शकत नाहीत. ही गोष्ट म्हणजे आपला दक्षिण आशियाई देशांचा वारसा. आरोग्याचा प्रश्न निर्माण होते तेव्हा तुम्ही कुठल्या भागात राहता हे महत्वाचं ठरतं.
सर्व भारतीयांसह इतर देशांतील नागरिकांना ते दक्षिण आशिया खंडातील असल्यानं त्याचा त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होतोय हे माहिती नाही. याचं महत्वाचं निरिक्षण म्हणजे आज जगातील सर्वाधिक हृदयरोगाचे रुग्ण हे दक्षिण आशियाई आहेत. पण यावर ब्रिटिश लोक मोठ्या प्रमाणावर कारणीभूत असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे.