
बापाच्या डोळ्यातलं पाणी कधीच दिसत नाही; लेकाला सोडायला आलेल्या पित्याचा भावनिक Video Viral
बाप आणि लेकाचं नात कधीच दिसत नसतं. जसं आई आपल्या लेकरांना जीवापाड जपते, त्यांना जीव लावते तेवढाच पिता आपल्या लेकरांना जीव लावत असतो. पण ज्यावेळी हे लेकरं शिक्षणाच्या किंवा नोकरीच्या निमित्ताने दूर जायला निघतात तेव्हा आईच्या डोळ्यात टचकन् पाणी येते पण पित्याच्या डोळ्यात पाणी असूनही त्याच्या डोळ्यात ते उतरत नाही.
हेही वाचा - ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका मुलाने आपल्या पित्याचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. तो बाहेरगावी निघाला असून त्याला सोडायला त्याचे वडिल आले आहेत. ट्रेन निघाल्यावर ते मुलाबरोबर मुलगा दिसेनासा होईपर्यंत चालत राहतात. प्रत्येक वेळी सोडायला आल्यावर ते मी दिसेनासा होईपर्यंत चालतात असं कॅप्शन या मुलाने व्हिडिओवर टाकलं आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ पाहून आपणही भावनिक व्हाल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला आपल्या वडिलांची आठवण नक्की येईल. कारण प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी पित्याच्या खांद्यावर असते म्हणून त्याला कधी रडता येत नाही पण तेही भावनिक असतात. त्यांच्याही डोळ्यात अश्रू येऊ शकतात पण त्यांना ते दाखवता येत नाहीत. हा भावनिक व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जातो.