

MCOCA Against Adulterators
esakal
FDA Action on Fake milk: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती भेसळखोरांची. जेव्हापासून आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची धुरा हाती घेतली आहे, तेव्हापासून अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्यांची आणि प्रतिबंधित पदार्थ विकणाऱ्यांची झोप उडाली आहे. त्यातच आता प्रतिबंधित पदार्थांची विक्री करणारे आणि संबंधित साखळी चालवणाऱ्यांवर थेट मकोका कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचा निर्णय तुकाराम मुंढे यांनी घेतला आहे.