
धार्मिक विधीची नावाखाली लोक काही करतील सांगता येत नाही. तैवानमध्ये धार्मिक स्थळी विधीच्या नावाखाली गर्भवती महिलेच्या पायांमध्ये फटाके फोडण्यात आले. घटनेनंतर, ती महिला गंभीर जखमी झाली आणि तिचा गर्भपातही झाला. सध्या महिलेवर उपचार सुरू आहेत. तर धार्मिक स्थळाच्या सदस्यांना भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.