
मुली पौगंडावस्थेत आल्यावर मासिक पाळी येणे ही खूप साधारण गोष्ट आहे पण नुकत्याच जन्मलेल्या पाच दिवसाच्या चिमुकलीला जर मासिक पाळी आली तर.. पण तुम्हाला वाटेल, हे कसं शक्य आहे. हे खरंय.
पाच दिवसाच्या चिमुकलीला मासिक पाळी आल्याचे धक्कादायक आणि अविश्वसनीय प्रकरण समोर आले. सध्या या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. (five day old new born baby girl got menstruation periods know reason how is it possible)
चीनमध्ये राहणाऱ्या महिलेने काही दिवसापूर्वी एका नवजात बालिकेला जन्म दिला त्यानंतर पुढे पाच दिवसानंतर या चिमुकलीला पिरियडस आल्याचं लक्षात येताच आईच्या अंगावर काटा आला. महिलेने आपल्या मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
जेव्हा डॉक्टरांनी या नवजात मुलीला तपासले तेव्हा डॉक्टरांनी मुलीला घाबरण्याचं कारण नसल्याचं म्हटलं. याला निओनेटल मेंस्ट्रुएशन म्हणजेच नवजात बाळाला पिरीयडस येणे असं म्हणतात.
डॉक्टर पुढे म्हणाले, "गर्भधारणेच्या शेवटच्या महिन्यांमध्ये काही वेळा भ्रुणाच्या शरीरात इस्ट्रोजेन जातं. तेच इस्ट्रोजेन बाळाच्या योनीतून बाहेर पडतं. ज्यामुळे पिरियडस आलं असं वाटतं पण हे फक्त आठवडाभरच असतं. बाळाच्या शरीरातून पुर्णपणे इस्ट्रोजेन बाहेर पडले की ब्लिडींग येणं बंद होतं."
ही एक साधारण गोष्ट आहे. त्यामुळे कोणताही गैरसमज होऊ नये, असेही डॉक्टरांनी सांगितले. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय असून नेटकरी यावर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.