Viral Video : विमानातंच प्रवाशाने एअर होस्टेसशी घातली हुज्जत; खाली उतरवून केली अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : विमानातंच प्रवाशाने एअर होस्टेसशी घातली हुज्जत; खाली उतरवून केली अटक

दिल्ली : दिल्ली विमानतळावर एका प्रवाशाने विमानातील महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला आहे. दिल्ली ते हैदराबाद या स्पाईसजेटच्या फ्लाईटमध्ये दिल्ली विमानतळावर हा प्रकार घडला. असभ्य वर्तन केल्यामुळे महिला कर्मचाऱ्याने सदर प्रवाशाची तक्रार केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक प्रवाशी विमानातील महिला कर्मचाऱ्याशी हुज्जत घालताना दिसत आहे. तर वारंवार तिला हिंदी मध्ये बोलण्यासाठी सांगताना दिसत आहे. त्यानंतर बाकीच्या काही लोकांनी मध्यस्थी करून दोघांनाही शांत केलं आहे. त्यानंतर सदर महिला कर्मचाऱ्याने तक्रार दाखल केली होती.

या घटनेनंतर या प्रवाशाला आणि त्याच्यासोबत असलेल्या सहप्रवाशांना खाली उतरवून विमानतळावरील सुरक्षा पथकाच्या ताब्यात देण्यात आले. अबसार आलम असं या आरोपीचं नाव असून त्याला स्पाईसजेटच्या सुरक्षा अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.