
Viral : जंगलातून जाताना अचानक पुढे उभा राहिला वाघ; थरकार उडवणारा Video
आपण जंगलातून गाडीवर कधी प्रवास केलाय? जरी जंगलातून प्रवास केला असेल तर असे प्रसंग क्वचितंच घडतात. जंगलातून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वाराचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. सुसांता नंदा या वन अधिकाऱ्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
हेही वाचा - सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक चारचाकी थांबली असून त्यातील एक व्यक्ती व्हिडिओ शूट करत आहे. तर जंगलातील रस्त्यावर पुढे एक वाघोबा थांबलेला आपल्याला दिसतोय. एक दुचाकीस्वार पुढे वाघ असतानाही समोर येतो आणि वाघ अचानक गाडीकडे येऊ लागतो. तेवढ्यात दुचाकीस्वार गाडी पाठीमागे घेत निघून जाताना या व्हिडिओत दिसत आहे.
दरम्यान, दुचाकी पुढे गेल्यानंतर वाघ दुचाकीच्या दिशेने येत होता. दुचाकीस्वाराने तात्काळ मागे फिरण्याचा निर्णय घेतल्यामुळे तो वाचला. एका वन अधिकाऱ्याने हा व्हिडिओ शेअर केला असून जंगलातून प्रवास करताना वाहने हळू चालवायला पाहिजेत असं अवाहन त्यांनी केलं आहे. तर हा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.