Viral : सिगारेट ओढणाऱ्या मित्राला पळून पळून हाणला; Video पाहून लहानपणाची येईल आठवण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral : सिगारेट ओढणाऱ्या मित्राला पळून पळून हाणला; Video पाहून लहानपणाची येईल आठवण

आपण लहानपणी अनेक भांडणे किंवा वेगवेगळे प्रयोग केलेले असतात. अनेकजणांनी लहानपणी व्यसनाची सवय लावून घेतलेली असते. तर काही मित्रांचे जबर भांडणे झालेले असतात. आपल्याही अनेक आठवणी आजही आपल्याकडे असतात. सध्या असाच दोन वृद्ध व्यक्तींचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील एक व्यक्ती सिगारेट ओढण्याचा प्रयत्न करत आहे. पण पेटवण्याआधीच दुसरा एक व्यक्ती त्याला आडवा येत आहे. सिगारेट पेटवट असताना दुसरा व्यक्ती त्याची सिगारेट विझवत असतो. त्यामुळे तो त्याच्या पाठीमागे मारण्यासाठी धावतो पण तो पळून जातो. हे लहानपणीचे मित्र असल्याचं सांगण्यात येत असून हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आपल्या लहानपणाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

टॅग्स :friendship dayviral video