खतरों के खिलाडी! डान्स करता करता मुलगी लटकली छताला; भयानक Video Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

खतरों के खिलाडी! डान्स करता करता मुलगी लटकली छताला; भयानक Video Viral

डान्स हा अनेकांच्या आवडीचा विषय आहे. तर काहीजण असा डान्स करतात की ते पाहून सर्वजण थक्क होतात. काहीं लोकांच्या डान्सचा धसका काहीवेळा घ्यावा लागतो. डान्स करताना भान नसणाऱ्या एका मुलीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तर हा व्हिडिओ पाहून आपलाही काही वेळ श्वास थांबेल.

हेही वाचा - क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी घरात डान्स करताना दिसत आहे. तिचा डान्स पाहून भल्याभल्यांची झोप उडेल असा तिचा डान्स आहे. डान्स करता करता ही मुलगी मध्येच कपाटावर चढत आहे तर छताला लावलेल्या आडव्या अँगलला लटकत आहे. छताला लटकून ही मुलगी झोका घेताना या व्हिडिओत दिसत आहे.

हेही वाचा: Viral Video : पेट्रोलिंग करणारे पोलीस, हायवे अन् भावाने गायलेलं गिटारवरील गाणं

दरम्यान, या मुलीमध्ये एवढा जोश कुठून येतो असा सवाल काही नेटकऱ्यांनी केला आहे. तर या मुलीच्या डान्सची स्पीड पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. हा व्हिडिओ आत्तापर्यंत ६ लाख सत्तर हजार लोकांनी लाईक केला असून अनेकांनी आपल्या मजेशीर कमेंट या व्हिडिओवर केल्या आहेत.