
नवी दिल्ली: मुलींचे लांब केस त्यांचा जीव वाचवण्यास कारणीभूत ठरु शकतात. यासंबंधीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी एका उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती. ती खाली पडणार होती, त्याचवेळी इमारतीवर उपस्थित असलेल्या गार्डने तिचे लांब केस पकडले. केसांच्या पकडीमुळे ती खाली पडण्यापासून वाचली आणि तिचा जीव थोडक्यात वाचला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.