A student was injured after a roof plaster collapsed during a class : शिक्षक वर्गात शिकवत असताना छताचं प्लॅस्टर कोसळल्याने एक विद्यार्थी जखमी झाला आहे. सोमवारी उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यातील बालापार गावातील एका सरकारी शाळेत हा प्रकार घडला. या घटनेनंतर शाळेत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. तसेच या घटनेचा व्हिडीओही आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.