VIRAL VIDEO

PUNE GRAND TOUR AAJOBA VIRAL VIDEO

esakal

आप्पाचा विषय लै हार्ड हाय! 'पुणे ग्रँड टूर स्पर्धेत' आजोबांचीच हवा, देशी सायकलीवरुन फिरतानाचा Viral video

PUNE GRAND TOUR AAJOBA VIRAL VIDEO: पुण्यात पार पडलेल्या बजाज पुणे ग्रँड टूर 2026 या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेत एक वेगळाच क्षण पाहायला मिळाला. देशी सायकलवरुन जाणारे बेलाजी पात्रे हे आजोबा स्पर्धकांच्या मागे जाताना दिसले आणि क्षणात सोशल मीडियावर व्हायरल झाले.
Published on

Pune Grand Tour 2026 Viral Video: पुण्यात जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीनं 'बाजाज पुणे ग्रँड टूर 2026' या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. 19 ते 23 जानेवारी रोजी पुणे शहरात ही स्पर्धा पार पडतेय. या स्पर्धेतील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताय. पुणेकर स्पर्धकांना चेअरअप करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com