Video : लेकीला भेटायला जाण्यासाठी पैसे नव्हते; दिव्यांग वृद्धेने 170KM तीन चाकी सायकलने केला प्रवास

शेवटी आईच ती! नात्यांची गुंफण अन् लेकीची ओढ
Video
Video Sakal

नात्यामध्ये प्रेम आणि एकमेकांसोबत ओढ असेल तर व्यक्ती काहीही करायला तयार असतो. एक आई आपल्या लेकरांसाठी काय करू शकते हे वेगळं सांगायची गरज नाही. असाच एक भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक दिव्यांग वृद्ध आजी आपल्या लेकीला भेटण्यासाठी तब्बल १७० किमीचा प्रवास करत आहे.

Video
Viral Video : जेव्हा यमदेव गाढ झोपेत असतो! रस्त्यावरील पादचारी मार्गाच्या छतावरून चालवली सायकल

अधिक माहितीनुसार, मध्यप्रदेशमधील गुना जिल्ह्यातील अशोकनगर येथील ही आजी असून लीबिया बाई असं या दिव्यांग वृद्ध महिलेचं नाव आहे. तिची मुलगी राजगढ जिल्ह्यातील पचोर येथी उदनखेडी या गावात राहते. आजीला खूप दिवसांपासून आपल्या लेकीला भेटण्याची इच्छा होती पण तिच्याकडे जाण्यासाठी पैसे नव्हते.

त्यामुळे या आजीने आपल्या तीन चाकी सायकलवरूनच लेकीला भेटायला जाण्यांच ठरवलं. आठ दिवसांत तिने १७० किमीचे अंतर पार करत लेकीचे गाव गाठले असल्याचा दावा या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये करण्यात आला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तीन चाकी सायकल ढकलत ही आजी चालत आहे. तिच्या सायकलवर बरेचसे सामानसुद्धा टाकलेलं दिसत आहे. आपल्या लेकीला भेटण्यासाठी या आजीची ओढ पाहून आपल्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

आपल्याला नाते टिकून ठेवायचे असतील किंवा एखाद्या व्यक्तीची ओढ असेल तर परिस्थिती आडवी येत नाही याचे हे उत्तम उदाहरण. एक आई आपल्या लेकरांना भेटण्यासाठी किती आतुर असते. त्यासाठी ती काय काय करू शकते हे या व्हिडिओमधून दिसेल.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच शेअर केला जात असून यावर नेटकऱ्यांनी भावनिक कमेंट केल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com