Viral Video : नवरदेवाचा जलवा! लग्नासाठी वऱ्हाड आणलं 51ट्रॅक्टरवर बसून; स्वत:ही ट्रॅक्टरवरच आला

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Groom
GroomSakal

लग्न म्हणजे सर्वांच्या आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस असतो. या दिवशी दोन्ही कुटुंबातील सर्वजण उत्साह साजरे करतात. डान्स, मेहंदी, वरात हे कार्यक्रम लग्न सोहळ्याचा उत्साह वाढवत असतात. पण काही नवरदेव खूप जिद्दी आणि प्रयोगशील असतात ते लग्नामध्ये काय करतील त्याचा नेम नसतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Groom
Crime : 'मी या हद्दीचा दादा, माझ्या नादी लागू नको नाहीतर गेम करेन' म्हणत तरुणावर चाकूने सपासप वार

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका नवरदेवाने आपल्या लग्नासाठी तब्बल ५१ ट्रॅक्टर घेऊन हजेरी लावली आहे. तो स्वत:ही ट्रॅक्टरमध्ये बसून आला आणि त्याने गावातील वऱ्हाडही ट्रॅक्टरवर बसून आणलं. ही घटना राजस्थानमधील बारमेर या जिल्ह्यात घडली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

दरम्यान, या ५१ ट्रॅक्टरमधील वऱ्हाडाची रांग तब्बल १ किलोमीटरपर्यंत लागली होती. ट्रॅक्टरमधून जवळपास २०० वऱ्हाडी मंडळी आणि पाहुणे मंडळी बसून आली असल्याची माहिती आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांनी चांगलाच शेअर केला असून त्यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत. पण नवरदेवाचा अनोखा प्रयोग आपणही पहिल्यांदाच पाहत असाल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com