
लग्नाच्या आधी दोन दिवस नाचण्यावरुन झालेल्या भांडणाच्या रागातून नवरीच्या मावस भावाने लग्न लागण्याआधी नवरदेव आणि वऱ्हाडींना बेदम मारहाण केली. यामुळे लग्न समारंभात गोंधळ निर्माण झाला. जखमी नवरदेवाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. मारहाणीमुळे जखमी झालेल्या नवरदेवाने नवरीच्या गावी जाण्यास नकार दिला, म्हणून नवरीच हॉस्पिटलमध्ये पोहोचली. रात्री उशिरा, गावातील मोजक्या लोकांच्या उपस्थितीत रुग्णालयातच लग्नाचे विधी पूर्ण झाले.