Video Viral : वरबाप जोमात! भर मंडपात लावले ठुमके; बायकाही लाजल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video Viral

Video Viral : वरबाप जोमात! भर मंडपात लावले ठुमके; बायकाही लाजल्या

लग्नामध्ये डान्स करणारे अनेकजण आपण पाहिले असतील. अनेकजण लग्नामध्ये आपला विनोदी किंवा चांगल्या डान्सचं कौशल्य दाखवत असतात. पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नवरदेवाच्या वडिलांनीच भन्नाट डान्स केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये भर मंडपात नवरदेवाचे वडील "फीर भी ना माने बत्मीज दिल" या गाण्यावर भन्नाट डान्स करत आहेत. हा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. तर एवढ्या वयात किती फिटनेस आहे अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, वरबापाने केलेल्या डान्सचा व्हिडिओ पाहून मंडपातल्या बायकाही लाजून गेल्या असतील. त्यांच्या या परफेक्ट डान्सचे सगळ्यांनाच वेड लावलं आहे. या व्हिडिओला इंस्टाग्रामवर एक लाखापेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं आहे. तर त्यावर आपल्या विनोदी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.