
‘गुलाबी साडी’ हे मराठी गाणं सोशल मीडियावर सध्या जोरदार ट्रेंड होत आहे. मराठी भाषेतील हे गाणं विविध भाषेतील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अलीकडेच इन्स्टाग्रामवर एका नेटकऱ्याने एका लग्न समारंभातील काका-काकूंच्या डान्स परफॉर्मन्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून तरुणाई या जोडप्याला "कपल गोल" मानत आहे. वाढत्या वयासोबत त्यांचं प्रेम आणि नृत्य पाहून लोक चकीत झाले.