
Guru Purnima video: गुरुपौर्णिमेच्या पवित्र सणानिमित्त शिर्डीतील साईबाबा मंदिर आणि उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात भक्तांची अलोट गर्दी उसळली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिर्डी साईबाबा संस्थानात गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भक्त शिर्डीत दाखल झाले असून, मिरवणूक, पूजा आणि प्रसाद भोजनाने साईनगरी दुमदुमली आहे. दुसरीकडे, उज्जैनच्या श्री महाकालेश्वर मंदिरातही भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. या दोन्ही तीर्थक्षेत्रांमध्ये भक्तांचा उत्साह आणि श्रद्धा शिगेला पोहोचला आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ज्ञान आणि भक्तीचा संगम अनुभवण्यासाठी ही मंदिरे भक्तांचे केंद्रबिंदू ठरली आहेत. या दोन्ही मंदिराचे भक्तिमय व्हिडिओ समोर आले आहेत.