

हरियानातील गुरुग्राम शहरात भरधाव थार एसयूव्ही गाडीने रस्त्यावरून चालणाऱ्या एका व्यक्तीला आणि त्याच्या दोन नातवांना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, या तिघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली आहे. अपघातात संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.