

Hardik Pandya Fan Abuse Video : भारतीय क्रिकेट संघाचाअष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या हा त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी आणि मैदानावरील त्याच्या वृत्तीसाठी ओळखला जातो. पण अलिकडेच त्याने मैदानाबाहेर त्याच्या शांत व्यक्तिमत्त्वाचे प्रदर्शन करून चाहत्यांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हार्दिक एका असभ्य चाहत्याच्या शिवीगाळीकडे दुर्लक्ष करून शांतपणे त्याच्या कारकडे चालत जात असल्याचे दिसून येत आहे.